पिण्याच्या पाण्याजवळच ड्रेनेजचे पाणी File Photo
छत्रपती संभाजीनगर

पिण्याच्या पाण्याजवळच ड्रेनेजचे पाणी

मुख्य बसस्थानकातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, प्रवाशांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

Drainage water is flowing right next to the drinking water source

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्य बसस्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. याच परिसरात असलेल्या ड्रेनेजमधून घाण पाणी वाहत असल्याने प्रवासी हे पाणी पिण्यास तयार नाहीत. याकडे येथील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना विकत पाणी घ्यावे लागत आहे.

बसस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे तीन ते चार नळ बसवण्यात आले आहेत. याच ठिकाणी सतत ड्रेनेज लिकेज होत असल्याने त्या ठिकाणी घाण पाणी वाहत आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी या पाण्यातून वाट काढावी लागते. त्यामुळे प्रवासी या पाण्याकडे जाणे टाळत आहेत. विशेष म्हणजे या पाण्यापासून काही अंतरावरच अधिकास्यांचे दालने आहेत. तरीही याकडे ते दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. प्रवासात त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

परिसरात दुर्गंधी

ड्रेनेजच्या घाण पाण्याची दुर्गंधी बसस्थानक परिसरात पसरत असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एसटीच्या अधिकारयांनी ड्रेनेजची थातूर मातूर डागडुजी केली आहे. त्यामुळे हे घाण पाणी बंद होण्याऐवजी ते मोठ्या प्रमाणात बाहेर वाहत आहे. या घाण पाण्यामुळे बसस्थानक परिसरात वावरणारया एसटी कर्मचास्यांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे वरिष्ट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ड्रेनेजचे लिकेज बंद करून कर्मचास्यांसह प्रवाशांना या त्रासांतून मुक्त करावे, अशी मागणी प्रवाशांकडून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT