छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेमध्ये आज पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. अनेक विद्याथ्यांना हॉलतिकीट मिळाले नाही. त्यामुळे काही केंद्रांवर बैठक क्रमांक आणि ओळखपत्रावर परीक्षा घेण्यात आली. एकूण ८४ हजार विद्याथ्यांपैकी ७५ हजार विद्याथ्यर्थ्यांचेच हॉलतिकीट जनरेट झाले. उर्वरित विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले नाही. महाविद्यालयांनी वेळेत परीक्षा शुल्क न भरल्यामुळे हॉलतिकीट जनरेट होऊ शकले नाहीत, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला.
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात परीक्षेचे एक केंद्र होते.
या केंद्रावर बीएससी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांचे मिलिंद महाविद्यालयातील ६७ आणि डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालयातील ५६ असे एकूण १२३ परीक्षार्थी होते. तथापि, या केंद्रावर मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात बी. एस्सी संगणकशास्त्र या विषयाच्या १२३ विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांनी परीक्षेसाठी प्रवेश दिला नाही.
या संदर्भात संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठ परीक्षा विभागास कोणतीही कल्पना न देता या विद्याथ्यांची परीक्षा घेण्यास ऐनवेळी नकार दिला. ही बाब समजल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तात्काळ मिलिद विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय या होम सेंटरवर सर्व विद्याथ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले. त्यानुसार दोन्ही महाविद्यालयांत या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू दिला नाही, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
पदवी प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होऊनही अद्यापही महाविद्यालयांकडून ८ हजार ८४८ विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म विद्यापीठ परीक्षा विभागाकडे दाखल झालेले नाहीत, अशी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. चार जिल्ह्यांतील केंद्रांवर एकूण १८ अभ्यासक्रमांचे ८४ हजार १८३ विद्यार्थी आहेत. १५ डिसेंबरपर्यंत आवेदन दाखल केलेल्या ७५ हजार ४९२ विद्याथ्यांचे हॉलतिकीट जनरेट झाले.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कलम ४८ (४) नुसार संलग्नित महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा घेणे बंधनकारक आहे. तरीही डॉ. बाबासाहेव आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षेपासून ऐनवेळी रोखले, या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषी सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे.
आमच्या कॉलेजला बौ.ए. आणि बी. कॉम. चेच होम सेंटर होते. बी. एस्सी. चे सेंटर नव्हते. परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची यादी, त्यांचे आसन क्रमांक हे विद्यापीठ पुरविते. आम्हाला अशी कोणतीही माहिती विद्यापीठाने कळविलेली नव्हती. आज जेव्हा विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा आम्ही विद्यापीठाशी संपर्क साधला. परीक्षा २ ते ३ या वेळेत होती. विद्यापीठाने ३ वाजून १ मिनिटाने आम्हाला डेटा पाठविला. एनईपीनुसार प्रथम वर्षाच्या परीक्षा होम सेंटरवर घेण्याचे परिपत्रक विद्यापीठाने काढलेले आहे. मग इतर कॉलेजचे विद्यार्थी आमच्या केंद्रावर कसे आले ? सगळा गोंधळ विद्यापीठाच्या परिपत्रकामुळे झालेला आहे.विनायक खिल्लारे, प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय