Donate the amount of the Son marriage Aaher to the Chief Minister's Relief Fund.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मुलाच्या लग्नामध्ये रोख स्वरुपात जमा झालेली आहेराची ५५ हजार रुपयांची रक्कम गुरुवारी एकबोटे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून जमा केली. डॉ. अभय व नंदा या एकबोटे दाम्पत्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील विविध घटक मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपले योगदान देत आहेत. डॉ. अभय एकबोटे यांच्या मुलाचे डॉ. कौशिकचे लग्न डॉ. रेया यांच्याशी शुक्रवारी झाले. या लग्नाच्या पत्रिकेत विवाहप्रसंगी वधूवरांना देण्यात येणारा आहे.
न स्विकारण्याबाबत एकबोटे कुटुंबीयांनी आपल्या आप्तेष्टांना कळविले होते. तसेच शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी पत्रिकेतच क्यूआर कोड प्रसिद्ध करण्यात आला. त्याप्रमाणे आप्तेष्टांनी आपली मदत दिली. त्यात एकबोटे कुटुंबीयांनी स्वतःचे ५ हजार रुपये असे ५५ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सुपूर्द केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते हे उपस्थित होते.