Do not use housing scheme installments to pay off outstanding debts Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रमाई आवास योजनेतून पात्र लाभार्थीना अडीच लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येतो, परंतु या घरकुल बांधण्याच्या हप्त्यातून उधाऱ्या फेडू नका, असा सल्ला गुरुवारी (दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित घरकुल बांधकामाच्या पहिल्या हप्त्याच्या वितरण सोहळ्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला. तसेच प्रशासनाला कामकाजाची गती वाढविण्याचे निर्देशही दिले.
यावेळ ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, समाज कल्याण समितीचे सभापती जालिंदर शेंडगे, आयुक्त अमोल येडगे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेविका हर्षदा शिरसाट, कीर्ती शिंदे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री म्हणाले की, रमाई आवास योजनेत बोगस लाभार्थी दाखवून लाभ उचलल्याचा आरोप झाला होता.
त्यामुळे योजनेचे कामकाज थांबणार का, अशी स्थिती निर्माण झाली होती, पंरतु महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासनाने याबाबत चौकशी केली. तसेच कागदपत्रांची तपासणी करून योजनेला आरोपातून मुक्त केले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेच्या कामाचे कौतुक असल्याचेही पालकमंत्री शिरसाट म्हणाले.
दरम्यान, लाभधारकांना अर्ज भरून देण्यासाठी प्रशासनाने एक कक्ष सुरू करण्यात यावा. या कक्षात मदतनीस म्हणून अर्ज भरून देण्यासाठी ४ कर्मचारी नियुक्त करावे. समाज कल्याण विभागाचा एक अधिकारी घरकुल योजनेच्या प्रत्येक बैठकीला यापुढे हजर राहील, असे आदेशही पालकमंत्री शिरसाट योजनेच्या पैशातून घरच बांधावे. त्यातून इतर कामे उरकण्याचा प्रयत्न करू नये. तसेच आता घरकुलसाठी पहिला हप्ता २५ ऐवजी ५० हजार स्थिती आणि लाभार्थीची यादी प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला प्रसिद्ध करावी. २ हजार लाभार्थीची यादी प्रशासनाने सादर करावी,
लाभार्थी निवडीची प्रक्रिया शॉर्ट हवी : मंत्री सावे
घरकुल योजनेला लाभ मिळविण्यासाठी लाभार्थीना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. या योजनेत लाभार्थी निवडीची प्रक्रिया शॉर्ट करावी. ज्यामुळे तातडीने कामे पूर्ण होतील. त्यासाठी एक खिडकी योजना व समिती नेमावी. तातडीने अर्ज निकाली काढून पात्र लाभार्थीना निधी वाटप करण्याची सूचना राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आयुक्तांना केली. या योजनेसाठी पीएम आवास योजनेप्रमाणेच निधी वाटप केल्यास घरकुलांचे काम तातडीने पूर्ण होण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, योजनेतील अपात्र लाभार्थीनी काळजी करू नये, समाज कल्याण मंत्री सर्वांचे अर्ज मंजूर करतील. त्यासाठी पालकमंत्र्यांनी आणखी पाच कोटी रुपये शासनाकडे मागितले आहेत, असेही त्यांनी सांगितले.