DMIC Project : डीएमआयसीला सुपीक जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध file photo
छत्रपती संभाजीनगर

DMIC Project : डीएमआयसीला सुपीक जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

निलजगाव येथे सहा गावांतील शेतकऱ्यांची बैठक

पुढारी वृत्तसेवा

DMIC Project: Strong opposition of farmers to give fertile land to DMIC

निलजगाव, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील निलजगाव, पाडळी तसेच छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाडीवाट, घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव या सहा गावांतील शेतकऱ्यांनी डीएमआयसीसाठी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. निलजगाव येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत एकजुटीने हा विरोध नोंदविण्यात आला.

यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वी ज्या भागात डीएमआयसी प्रकल्प उभारण्यात आले आहेत, तेथील परिस्थितीचा दाखला देत विविध समस्या मांडल्या. डीएमआयसी परिसरात पाणी दूषित होणे, पिकांवर त्याचा परिणाम होणे, सांडपाण्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, विहिरी व बोअरवेलचे पाणी दूषित होणे तसेच शेतीतील पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.

औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना शेतातील विहिरी, बोअरवेल, पक्की घरे आणि शेतीपूरक व्यवसायही बाधित होतात. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना अपेक्षित रोजगाराच्या संधी मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीसोबत विविध शेतीपूरक व्यवसाय सुरू केले असून, त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. परिसरातील जमीन सुपीक असून दर्जेदार पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे अशा सुपीक व पिकाऊ जमिनीवर औद्योगिक कारखानदारी उभारण्यास शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना व समस्या गांभीर्याने लक्षात घेऊन या परिसरातील जमिनी डीएमआयसीसाठी संपादित करू नयेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यापुढेही जमीन संपादनाविरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT