Crime News : बीडीओच्या दालनात अपंगास मारहाण; तक्रार का दिली म्हणत लुटले file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : बीडीओच्या दालनात अपंगास मारहाण; तक्रार का दिली म्हणत लुटले

या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Differently-abled person assaulted in BDO's office; robbed for filing a complaint

मंठा, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील खोराड सावंगी येथील ग्रामपंचायतीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून येथील अपंग समाजसेवक भुरा रावसू पवार यांनी १५ व्या वित्त आयोगातील ३ लाख ६९ हजार ५०२ रु चा निधी बहुमत नसतांना खर्च केल्याची तक्रार केल्याने या तक्रारीच्या सुनावणी दरम्यान भुरा पवार यांना तक्रार का केली या कारणावरुन गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुरा पवार यांनी तक्रारीत म्हंटले आहे कि, खोराड सावंगी येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगातील ३ लाख ६९ हजार ५०२ रु चा निधी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ११ जून रोजी बहुमत नसताना सदर निधी खर्च केला आहे. या तक्रारी बाबत बुधवार (ता. २३) रोजी पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी यांच्या दालनात सुनावणी ठेवण्यात आली होती.

या सुनावणी दरम्यान तक्रारदार भूरा पवार यांना मारहाण करण्यात आली. यावेळी भुरा पवार यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळ्याचे लॉकेट हिसकावून घेऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विधाटे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT