महापालिकेत वंचित-काँग्रेस एकत्र file photo
छत्रपती संभाजीनगर

महापालिकेत वंचित-काँग्रेस एकत्र

महापालिका निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे चार नगरसेवक आणि काँग्रेसच्या एकमेव नगरसेविकेने एकत्र येत संयुक्त लोकसेवा विकास आघाडी या नव्या गटाची स्थापना केली.

पुढारी वृत्तसेवा

Deprived-Congress unite in Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे चार नगरसेवक आणि काँग्रेसच्या एकमेव नगरसेविकेने एकत्र येत संयुक्त लोकसेवा विकास आघाडी या नव्या गटाची स्थापना केली.

या गटाची शुक्रवारी (दि. १३) अधिकृत नोंदणी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे केली. या नव्या आघाडीच्या गटनेतेपदी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसर खान यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

नियुक्तीनंतर अफसर खान म्हणाले, शहरातील विकासात्मक प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडून नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सुविधा आणि झोपडपट्टी भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जनहिताच्या मुद्द्द्यांना प्राधान्य देत कामकाजात समन्वय साधण्यासाठी ही आघाडी स्थापन केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेविका झरीना जावेद कुरेशी, करुणा मेघानंद जाधव, काँग्रेसच्या नगरसेविका मलेका हबीब कुरैशी, वंचितचे पश्चिम निरीक्षक योगेश बन, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे जावेद कुरेशी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT