Demand to conduct a survey of the huge damage to agriculture due to cloudburst
विजय चौधरी
जरंडी सोयगाव तालुक्यातील जरंडी मंडळातील घोसला गावात ढगफुटीसदृश पावसाने होत्याचे नव्हते केले असतानाही महसूल प्रशासनाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत. पाच दिवस होऊनही शेतात तलाठी आला नाही त्यामुळे गोकुळ गवळी या शेतकऱ्याने शेतात दगडावर डोके आपटून जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी अकरा वाजता घोसला शिवारात घडली.
दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांची समजून काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान घोसला गावात पुराच्या प्रवाहात खटकाळी नाल्याच्या जवळील चाळीस ते ४५ शेतकऱ्यांची तब्बल ३०० एकर क्षेत्र पिकांसह पाण्यात वाहून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. शनिवारी केवळ कृषीचे तीन कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करत होते तालाठीच सोबत नसल्याने या कर्मचाऱ्यांनीही दुपारपूर्वीच पंचनामे प्रक्रिया ठप्प केली होती.
घोसला गावावर झालेल्या ढगफुटीच्या पावसाने अख्खे गाव नुकसानीमुळे बाधित झाले आहे खटकाळी नदीचा पूर थेट शेतात शिरून, पिके व शेतजमीन वाहून गेल्या आहे यामध्ये तीनशे एकरवरील चाळीस ते ४५ शेतकरी बाधित झाले आहे. यामध्ये नदीच्या उगम स्थानावर असलेल्या गोकुळ जगन गवळी यांचा गट १६२ पूर्णपणे एकूण चार एकर वाहून गेला असून त्यामध्ये शेतीऐवजी तलाव झाला आहे.
त्यामुळे गोकुळ गवळी यांचे शेत उजाड झाले आहे. परंतु अद्यापही प्रशासनाचे पथक ग्राम महसूल अधिकारी शेतावर पंचनाम्यासाठी पोहचले नाही, असा रोष व्यक्त करत त्यांनी शनिवारी शेतातील दगडावर डोके आपटण्याचा प्रयत्न केला होता. देवकाबाई गवळी, दिलीप गवळी, ऋश्री गवळी, या एकाच कुटुंबातील चार जणांचे दहा तेरा एकर क्षेत्र पुरात वाहून भूमिहीन झाले आहे.
नाल्याचा पुरात ४५ शेतकऱ्यांच्या शेतजमीन वाहून गेल्या असल्याचे चित्र घोसला गावात उद्भवलेले आहे. दरम्यान सुधाकर युवरे, ज्ञानेश्वर युवरे यांचे खटकाळी नाल्याच्या पुरात शेती वाहून पिकेही वाहून गेली आहे. शांताराम सोनार यांच्या शेतात चक्क नाला तयार झाला आहे. प्रशासनाच्या या बेफिकिरीमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी तातडीने पंचनामे सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.