Sambhajinagar News : वेतनवाढी, विविध भत्त्यांची रक्कम तात्काळ द्यावी, एसटी सेवानिवृत्त कर्मचारी मेळाव्यात एकमुखी मागणी  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : वेतनवाढी, विविध भत्त्यांची रक्कम तात्काळ द्यावी, एसटी सेवानिवृत्त कर्मचारी मेळाव्यात एकमुखी मागणी

मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मेळाव्यात देण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Demand for immediate payment of salary hike and various allowances at ST retired employee gathering

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. वेतनवाढीसह विविध भत्त्यांची रक्कम तात्काळ द्यावी, अशी एकमुखी मागणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी केली. मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मेळाव्यात देण्यात आला.

सिडको एन-३ येथे एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली तसेच सोलापूर, जळगाव बुलढाणा जिल्ह्यांतून ३०० पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत एसटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हायर पेन्शन मंजूर होत नसल्याने ती त्रुटी दूर करावी, २०१६ ते २०२० व २०२२ च्या करारानुसार वेतनवाढीचा फरक व विविध भत्त्यांची रक्कम द्यावी, वर्षभराचा एसटी पास द्यावा, सर्व बसमध्ये विनाफरक प्रवासाची मुभा द्यावी यासह इतर विषयांवर चर्चा झाली.

यावेळी डॉ. पी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. एस. एन. आंबेकर, कमलाकर पांगारकर, हरिभाऊ व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डी. ए. लिपणे-पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन हारुण पठाण यांनी केले. साहेबराव निकम यांनी आभार मानले.

या मेळाव्यात हिम्मतराव देशमुख, कल्याण शिंदे, बबन वडमारे, मुरलीधर पोपळघट, सय्यद अहेमद, अच्युत माने, देविदास कल्याणकर, इकबाल शेख, सुधाकर गायके, किसन साळवे, सोपान बांगर, रामचंद्र नवपुते, नाना मराठे, भागाजी कालभिले आदींची उपस्थिती होती.

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वेतनवाढीसह विविध भत्त्यांची रक्कम तात्काळ द्यावी. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हायर पेन्शन मंजूर होत नसल्याने ती त्रुटी दूर करावी, २०१६ ते २०२० व २०२२ च्या करारानुसार वेतनवाढीचा फरक व विविध भत्त्यांची रक्कम द्यावी, वर्षभराचा एसटी पास द्यावा, सर्व बसमध्ये विनाफरक प्रवासाची मुभा द्यावी. आदी प्रश्न निकाली काढावेत अन्यथा वेळप्रसंगी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मेळाव्यात देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT