Deadline extended until September 30 for e-Peak inspection
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामाकरिता मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे शेतकरी पीक नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पाहणी सर्वर डाऊन असणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे लोकेशन बरोबर दाखवत नसणे, शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जुळत नसणे इत्यादी अडचणींमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी करू शकले नाहीत. या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे १८ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार शेतकरी स्तरावरून करावयाच्या ई-पीक पाहणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपूर्वी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.