Dashmeshwar Shiva Temple built with public participation
भाग्यश्री जगताप
छत्रपती संभाजीनगर तसे पाहिले तर आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात महादेवाचे मंदिर बरेच आहेत. ज्याला अनेक आख्यायिका आहे. काही महादेव मंदिरे इतिहासाची आजही आठवण करून देते. महादेव मंदिरामुळे एक आगळी वेगळी ओळख यामुळे निर्माण झाली आहे, असेच म्हणावे लागणार आहे. दशमेशनगर परिसरातही आख्यायिका असणारे दशमेश्वर शिवमंदिर आहे. ज्या मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम होत असतात. असंख्य भाविक दर्शनासाठी येतात.
शहरातील दशमेनगर येथे दशमेश्वर शिव मंदिरात अनेक वर्षांपासून आहे. जगन्नाथ अप्पा वाडकर यांच्या संकल्पनेतून मंदिर निर्माण झाले आहे. कॉलनीच्या सहकारिनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले. वर्गणी जमा करून लोकसहभागातून दशमेशनगर येथील मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरच्या बाजूलाच दोन साधू - संतांची समाधी देखील आहे. संगमरवरी देखील केले आहे. जवळपास मार्केट देखील असल्याने आणि या भागांतून प्रतिदिन असंख्य नागरिक जात असून प्रत्येकजणाच्या दृष्टीस मंदिर पडते. त्यामुळे या मंदिरात असंख्य नागरिक प्रतिदिन दर्शन घेतात. शांत आणि स्वच्छ परिसर असल्याने अनेकजण या मंदिरात आवर्जून प्रतिदिन दर्शन घेण्यासाठी देखील येतात.
यामुळे पडले होते नदीला शिरापुरी नाव...
अशी आख्यायिका पूर्वज सांगतात की, मंदिरच्या दोन्ही बाजूंना दोन साधू-संतांची समाधी आहे. या ठिकाणी पूर्वी नदी होती. शिरापुरी असे त्या नदीचे नाव होते. आज इथे नाला झाला आहे. शिरापुरी नदी ही दशमेशनगर ते दशमेश्वर शिवमंदिर ते शहानूरमिया दर्गापर्यंत नदी होती. मंदिर परिसरात दोन साधू-संत होते. त्यांची दर्यातील एका बाबांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे साधू-संत दशमेशनगर दशमेश्वर मंदिर येथे असलेले साधू-संत आपल्या मित्रांना नदीतून शिरापुरीचा नैवेद्य पाठवीत होते. नदीला शिरापुरी नदी असे नाव पडले.
बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्ती
दशमेश्वर शिवमंदिरात शिवाची पिंड आहे. बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्ती आहेत. आतमध्ये शनिमंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, दत्ताची मूर्ती, पार्वतीची मूर्ती आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन चार लोक काम करतात. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ आणि शांत, प्रसन्न असतो.
विविध धार्मिक कार्यक्रम
दशमेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्री, रामनवमी, श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात. तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. अनेक भाविक हर हर महादेव म्हणत दर्शन घेतात. पूजा आरती नित्यनियमाने केली जाते. संपूर्ण मंदिर परिसरात प्रतिदिन ओम नमः शिवायचा गजर करत भाविक दर्शन घेतात.