मराठवाड्यात 5345 हेक्टरवरील पिकांचे नुकसान File Photo
छत्रपती संभाजीनगर

Unseasonal Rain : मराठवाड्यात 5345 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गारपीट, अवकाळीचा फटका, ७७ जनावरे दगावली

पुढारी वृत्तसेवा

Crops on 5,345 hectares damaged in Marathwada.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसाचा फटका विभागातील तब्बल ८ हजार ७८० शेतकऱ्यांना बसला आहे. विभागात एकूण ५३४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच लहान मोठी ७७ जनावरे दगावली आहेत.

मराठवाड्यात ३० मार्चपासून अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागांत गारपीटही झाली. पावसामुळे मराठवाड्यातील २०९ गावे बाधित झाली आहेत. बीड जिल्ह्यात एका घराचीही पडझड झाली आहे.

कुठे किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान ?

छत्रपती संभाजीनगर ३३४०

जालना ५५९

परभणी 00

हिंगोली 00

नांदेड १८४

लातूर १२२१

धाराशिव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT