Crime News : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

घटस्फोटित महिलेला एकाने लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष लैंगिक अत्याचार केला.

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Woman Raped Under Pretext of Marriage

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घटस्फोटित महिलेला एकाने लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार २०२३ ते २०१५ या काळात मिसारवाडी भागात घडला. शेख वसीम नियाजो (रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला (२१) हिच्या तक्रारीनुसार, तिच्या पतीसोबत वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला आहे. तिला ४ आणि ६ वर्षांचे दोन अपत्य आहेत. ती शिवणकाम करून उपजीविका भागविते. आरोपीच्या कुटुंबाशी ओळख असल्याचा फायदा घेऊन त्याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी वसीमने तिला तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या मुलांना सांभाळतो असे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर वारंवार त्याने तिच्यावर अत्याचार केले. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पीडितेने त्याला लग्नाविषयी विचारणा केली तेव्हा त्याने तुझ्याशी लग्न करू शकत नाही असे म्हणून नकार देऊन निघून गेला. अखेर पीडितेने सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT