Crime News : चुलतभावाच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दीराला १० वर्षांची सक्तमजुरी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : चुलतभावाच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दीराला १० वर्षांची सक्तमजुरी

परिक्षेनिमित्त चुलतभावाच्या घरी आलेल्या एका नराधमाने भावाच्या पत्नीवर अत्याचार केला.

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Sexual Assault on Cousin's Wife; One Sentenced to 10 Years of Rigorous Imprisonment

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा परिक्षेनिमित्त चुलतभावाच्या घरी आलेल्या एका नराधमाने भावाच्या पत्नीवर अत्याचार केला. प्रकरणात आर-ोपी दीराला जिल्हा व सञ न्यायधीश आर.डी. खेडेकर यांनी १० वर्षांची सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

१२ प्रकरणात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला पती व मुलीसह राहत होती. आरोपी हा तिच्या पतीचा चुलतभाऊ असून तो ३ फेब्रुवारी २०२१ रोजी परी क्षेच्या निमित्ताने तो त्यांच्या घरी आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेचा पती कामावर गेल्यानंतर आरोपी घरातच थांबला होता.

पीडिता बाथरूममध्ये कपडे गोळा करत असताना आरोपीने तिला ढकलून पकडले. पीडिता आरडाओरड करू लागल्यावर तिची पाच वर्षांची मुलगी तेथे आली. मात्र आरोपीने पीडितेचे तोंड दाबून मुलीला सांगितले की, तिची आई घरी नाही. त्यानंतर आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. घटनेनंतर आरोपी पीडितेला धमकी देत तेथून पसार झाला.

काही वेळाने पीडितेने फोनवरून आई आणि पतीला घडलेला प्रकार सांगितला. प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक आर.बी. नागलोत यांनी दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीवेळी, सहायक सरकारी लोकाभियोक्ता सुजाता देशमुख-पाठक यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणी अंती न्यायालयाने नराधम दीराला दोषी ठरवत भादंवि कलम ३७६ (२) (एफ) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी, १० हजारांचा दंड, कलम ५०६ अन्वये १ वर्ष सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार बी.एन. जाधव आणि व्ही. कबाडे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT