Crime News : भडजी येथे विवाहितेची गळफास घेऊन जीवन संपवले file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : भडजी येथे विवाहितेची गळफास घेऊन जीवन संपवले

या बाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Married Woman Ends Her Life by Hanging Herself in Bhadji

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील भडजी येथील गायत्री आकाश वाकळे या वीस वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना शनिवारी (दि.९) घडली. या बाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी आपेगाव (ता. गंगापूर) येथील गायत्री हिचा विवाह तालुक्यातील भडजी येथील आकाश वाकळे यांच्यासमवेत दोन वर्षापूर्वी झाला होता. सदरील कुटुंब हे खुलताबाद-फुलंब्री रोडवरील भडजी गावाजवळ वास्तव्यास होते.

त्यांना सहा महिन्यांची मुलगी देखील आहे. मात्र गायत्रीने याच घरातील लोखंडी पाईपाला साडी गुंडाळून आपली जीवन यात्रा संपविली, सदरील प्रकार तान्हुली मुलगी सकाळी रडायला लागली, कुटुंब जागे झाले त्यावेळेस उघडकीस आला.

घटनास्थळी खुलताबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश झलवार व पोलिस कर्मचारी वारे यांनी भेट देऊन पंचनामा केला. खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गायसमुद्रे यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान सदर विवाहित महिलेने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झाला नाही. पोलिसांत मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास खुलताबाद पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT