Crime News : वकिलाला लुटले : रोखसह मोबाईल पळवला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : वकिलाला लुटले : रोखसह मोबाईल पळवला

मायानगर परिसरात एका वकिलाला अडवून चौघांनी मारहाण करत मोबाईल आणि रोख रक्कम लुटली.

पुढारी वृत्तसेवा

Crime News : Lawyer Robbed Mobile Phone and Cash Stolen

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मायानगर परिसरात एका वकिलाला अडवून चौघांनी मारहाण करत मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) मध्यरात्री घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शेख युनुस शेख रऊफ (रा. हनुमाननगर, गारखेडा) असे संशयिताचे नाव आहे.

वकील अर्जुन रावसाहेब लुखे (३४, रा. जयभवानीनगर) शुक्रवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास ते सिडको सिग्नल येथून जयभवानीनगरकडे पायी जात होते. मायानगर परिसरात पोहोचताच समोरून येणाऱ्या एका रिक्षाने अचानक त्यांच्या दिशेने धडक देण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते बाजूला सरकून पुढे जाऊ लागले. त्याचवेळी रिक्षामधून उतरलेल्या तिघांनी त्यांना गाठून मारहाण करत, त्यांच्याकडील मोबाईल आणि सुमारे दीड हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली. या प्रकरणी वकिलाच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत, संशयित शेख युनुस शेख रऊफला ताब्यात घेतले. इतर तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वीही अशाच गुन्ह्याची नोंद

या प्रकरणात ताब्यात घेतलेला शेख युनुस शेख रऊफ याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT