Crime News : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार FiIle Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार

खासगी क्लासेसचा शिक्षक गजाआड

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Divorced woman sexually assaulted under the pretext of marriage

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दाखवून आणि तिच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र बांधून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०२४ ते २८ ऑगस्ट दरम्यान रामनगर, मुकुंदवाडी भागात घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी २४ वर्षीय खाजगी क्लासच्या शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ शिवलाल मेहेर (२४, रा. रामनगर, मुकुंदवाडी) असे या आरोपी शिक्षकाचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २८ वर्षीय महिला ही रामनगर भागात राहते. तिचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. २६ ऑगस्ट २०२४ रोजी (कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी) आरोपी सौरभ मेहेर हा पीडितेच्या घरी गेला. तुझी आता फारकत झाली आहे, मी तुझ्यासोबत नक्की लग्न करणार आहे. सध्या आपण नवरा बायकोसारखे सोबतच राहू, असे आमिष दाखवून त्याने तिचा विश्वास जिंकला आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर ते दोघे 'रिलेशनशिप'मध्ये राहत होते आणि त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध होत होते. काही काळानंतर पीडितेने सौरभकडे लग्नासाठी तगादा लावला. मला असे राहणे योग्य वाटत नाही, असे ती म्हणाली. तेव्हा तिला गप्प करण्यासाठी सौरभने ऑगस्ट २०२५ मध्ये (पुन्हा कृष्ण जन्माष्टमीला) तिच्या घरातच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि भांगेत सिंदूर भरला. मी तुझाच आहे, तुला सोडून जाणार नाही. वेळ आली की आपण घरी सर्व सांगून टाकू, अशी थाप मारून त्याने तिच्यासोबत पुन्हा संबंध ठेवले.

एक महिन्याची मुदत मागितली अन् पसार झाला

लग्नाचे नाटक करून त्याने अनेक महिने तिचे शोषण सुरूच ठेवले. अखेर २८ जुलै २०२६ रोजी सौरभ तिच्या घरी आला असता, लग्नाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. मला आता असेच राहायचे नाही, लग्न करायचे आहे, असा हट्ट पीडितेने धरला. त्यावर सौरभने मला एक महिन्याची मुदत दे, मी लग्न करतो, असे सांगितले आणि तिथून पळ काढला. त्या दिवसानंतर सौरभने पीडितेचे फोन उचलणे आणि मेसेजला उत्तर देणे पूर्णपणे बंद केले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडितेने मुकुंदवाडी ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश वाकळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT