Crime News : बुलेट चोराला १ वर्ष कारावासाची शिक्षा pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : बुलेट चोराला १ वर्ष कारावासाची शिक्षा

प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Bullet thief sentenced to 1 year imprisonment

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरासमोर उभी केलेली बुलेट चोरून नेणारा आरोपी वैभव सुरेंद्र सांगळे (रा. संत ज्ञानेश्-वरनगर, एम-२ सिडको) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सतीश आहेर यांनी एक वर्षांचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (दि.४) ठोठावली, अशी माहिती सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

प्रकरणात राहुल प्रतापराव देशमुख (रा. एन-६ सिडको) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीने २७ मे २०१८ आपली बुलेट नेहमीप्रमाणे घरासमोर हॅन्डल लॉक करून उभी केली होती. संधी साधत आरोपीने बुलेट चोरून नेली. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन हवालदार राजेंद्र ढगे यांनी तपास करून आरोपी वैभव सांगळे याला बेड्या ठोकल्या.

तसेच त्याच्याकडून चोरी केलेली बुलेटसह अन्य चार बुलेटही जप्त केल्या होत्या. प्रकरणात ढगे यांनी दोषार-ोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील जे.एम. मनवर यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आर-ोपीला दोषी ठरवून भादंवि कलम ३७९ अन्वये आरोपी वैभव सांगळे याला एक वर्षाचा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून अनिता पांढरे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT