Sambhajinagar News : मध्यरात्री ९ गाड्यांचा ताफा; रस्त्यावर वाढदिवसाचा धिंगाणा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मध्यरात्री ९ गाड्यांचा ताफा; रस्त्यावर वाढदिवसाचा धिंगाणा

मिल कॉर्नर भागात फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

Convoy of nine vehicles at midnight; birthday revelry on the street

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मिल कॉर्नर भागात मध्यरात्री रस्त्यावर तब्बल नऊ चारचाकी वाहने उभी करून, फटाके फोडून एका तरुणाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या १५ ते २० जणांच्या टोळक्यावर क्रांती चौक पोलिसांनी कारवाई केली. आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तरुणांवर बुधवारी (दि. ७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य ऊर्फ बंटी दसपुते, प्रवीण कवडे पाटील, वेदांत पाटील, सुकेश भास्कर दांडेकर आणि त्यांचे इतर १५ ते २० साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. उपनिरीक्षक राजेश लाठे हे मंगळवारी रात्री पिटर मोबाईल आणि कर्मचाऱ्यांसोबत हद्दीत पेट्रोलिंग करत होते. रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, मिल कॉर्नर चौकात सिनलच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ काही लोक जमा झाले असून ते फटाके फोडत आहेत.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे १५ ते २० मुले रस्त्यावर घोळका करून उभी असल्याचे दिसले. चौकशीत आदित्य दसपुते याने माझा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी माझे मित्र जमले आहेत आणि ते फटाके फोडत आहेत, अशी कबुली दिली. या तरुणांनी रस्त्यावर थार आणि इतर मिळून तब्बल ९ कार उभ्या केल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास तपास अधिकारी कादिर आरिफ देशमुख हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT