Congress flag on Khultabad Municipality
सुनील मरकड
खुलताबाद : नगरपालिकेच्या निवडणुकीने तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत अस-लेली ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित न राहता आमदारांच्या नेतृत्वाची परीक्षा ठरली. अखेर मतदारांनी स्पष्ट कौल देत काँग्रेसच्या (मविका) नेतृत्वाखालील आघाडीच्या बाजूने सत्ता सोपवली. आमदार प्रशांत बंब आणि आमदार सतीश चव्हाण यांच्या राजकारणाला जोरदार धक्का दिला आहे.
या निवडणुकीचा निकाल पाहता, किरण पाटील डोणगावकर यांचे शहरातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, स्थानिक नेतृत्वावर जन-तेचा विश्वास अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. ही निवडणूक केवळ नगरपालिकेची नव्हे, तर प्रतिष्ठेची लढाई बनली होती. नगरपालिका निवडणूक ही दोन आमदारांसाठी केवळ स्थानिक स्वराज्यसंस्थेची निवडणूक नव्हती, तर ती पूर्णतः प्रतिष्ठेची लढाई बनली होती. आमदार प्रशांत बंब आणि आमदार सतीश चव्हाण यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपापल्या ताकदीचा पुरेपूर वापर केला. प्रचारासाठी मुख्यमंत्री, मंत्री यांच्या मोठ्या सभा, कार्यकर्त्यांचे जाळे, निधी आणि राजकीय डावपेच वापरण्यात आले, मात्र या साऱ्या प्रयत्नानंतरही मतदारांनी आमदारांच्या हस्तक्षेपाला नकार दिला.
स्थानिक पातळीवर निर्णय घेणारे, शहराच्या दैनंदिन प्रश्नांशी जोडलेले नेतृत्वच आपल्याला अपेक्षित असल्याचा संदेश मतदारांनी दिला. मतदारांनी यावेळी मोठे नेते नव्हे, तर काम करणारे लोकप्रतिनिधी हा निकष लावल्याचे दिसून आले. याचाच फायदा काँग्रेसला झाला. किरण पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने संयमित प्रचार करत, स्थानिक प्रश्न केंद्रस्थानी ठेवले. आजपर्यंतचा इतिहास पाहता शहरातील जनता नेहमी काँग्रेसच्या पाठीशी बिनशर्त उभी राहताना दिसली. हे आजच्या निकालवरून परत एकदा सिद्ध केले.
तरुणांना संधी, बदलाची नांदी
या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात तरुण उमेदवारांना संधी दिली. नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांत नव्या चेहऱ्यांनी विजय मिळवला. सोशल मीडिया, थेट जनसंपर्क आणि स्वच्छ प्रतिमा याचा तरुणांनी योग्य वापर केल्याचे चित्र दिसून आले. तरुण मतदारांनीही मोठ्या संख्येने मतदान करत, विकासाभिमुख राजकारणाची अपेक्षा व्यक्त केली.
भाजपासाठी आत्मपरीक्षणाची वेळ
या निकालामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी आमदार असूनही भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. प्रचारात मोठी ताकद असूनही अपेक्षित यश मिळाले नाही.
आमदारांच्या नेतृत्वाला नकार का?
मतदारांनी आमदारांच्या नेतृत्वाला नकार देण्यामागे कारण स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष नगरपालिकेतील विकासकामांबाबत असमाधान स्थानिक कार्यकर्ते यांचा नगरपालिकेत हस्तक्षेप या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम निवडणूक निकालावर झाल्याचे स्पष्ट दिसते.