वाळूजमधील मतदार मॅपिग कॅम्पमध्ये गोंधळ, मतदार संभ्रमात file photo
छत्रपती संभाजीनगर

वाळूजमधील मतदार मॅपिग कॅम्पमध्ये गोंधळ, मतदार संभ्रमात

गैरहजर बिएलओंवर करवाई करण्याची मतदारांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Confusion at voter mapping camp in Waluj, voters confused

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक विभाग तहसील कार्यालय गंगापूर यांचे वतीने वाळूज येथील जि.प. प्रशालेत सोमवार (दि.२३) रोजी ठेवण्यात आलेल्या मतदान मॅपिंग कॅम्पच्या पहिल्याच दिवशी सावळा गोंधळ उडाला. असंख्य बीएलओचीच गैरहजेरी दिसून आल्याने मतदारात संभ्रम निर्माण झाला.

याविषयी दक्ष नागरिकांनी थेट सबंधित तहसीलदारांकडे तक्रारी केल्या. तक्रारीची दखल घेत तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी तत्काळ जि.प. प्रशालेतील कॅम्पला भेट देऊन सबंधितांची कानउघाडणी केली. उद्यापासून सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने नागरिकांनी निःश्वास सोडला.

शासनाच्या निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्णयानुसार वाळूजच्या प्रशालेत तहसीलतर्फे सोमवारपासून सलग तीन दिवस मतदान एसआयआर मॅपिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे सलग तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कॅम्प सुरू राहणार आहे.

सर्वच मतदारांनी आपल्या संबंधित बीएलओ यांच्याकडून मॅपिंग करून घ्यावे. मॅपिंग करून घेणे सर्व मतदारांना बंधनकारक आहे. आपण सदर कॅम्पचा लाभ घेऊन मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केले आहे. त्यासाठीच अशा प्रकारचा कॅम्प ठेवण्यात आलेला असल्याचे त्यांनी यावेळी विभागाचा निर्णय चांगला असलातरी मुळात सांगितले. निवडणूक संबंधित बीएलओ व्यवस्थितरीत्या कामकाज करीत नसल्याच्या मतदाराच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा नियोजित उपक्रम पायदळी तुडविला जातो की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.

सदरचा कार्यक्रम ३१ मार्चपर्यत पूर्ण करावयाचा आहे. कॅम्पमध्ये गैरहजर राहणाऱ्या सबंधित बीएलओ यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नवनाथ वगवाड, तहसीलदार, गंगापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT