कॅनॉट भागात राडा करणाऱ्या आरोपींची सिडको पोलिसांनी हातकड्या घालून धिंड काढत माज उतरविला. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar Crime : कॅनॉटमध्ये गावगुंडांचा उतरविला माज

सिडको पोलिसांनी हातकड्या घालून काढली धिंड !

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गजबजलेल्या कॅनॉट प्लेस भागात चाकू, तलवारी उपसून जीव-घेणी हाणामारी करणाऱ्या गावगुंडांची सिडको पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत त्याच भागातून बुधवारी (दि. २८) रात्री हातकड्या घालून धिंड काढत चांगलाच माज उतरविला.

आताच जेलमधून आलोय, गेमच करतो अशा वल्गना करून चाकू, दांड्याने दोन गट कॅनॉटच्या मुख्य रविवारी (दि. २५) रात्री नऊच्या सुमारास चौकात भिडले होते. कुख्यात गुन्हेगारांच्या ८ ते १० जणांच्या दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या गटातील तरुणांनीही चाकूहल्ला केल्याने एक जण जखमी झाला होता.

विशाल खेत्रे आणि पवन गीते या दोन्ही गटाचे दोन जण गंभीर जखमी झाले. चार आरोपींना अटक झाली, तर अन्य आरोपींची धरपकड सुरू असून, आर-ोपींची संख्या वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिथे राडा, तिथेच आणले गुडघ्यावर

कुख्यात आरोपी गौरव नानासाहेब वानखेडे (२४), रोहन भगवान जाधव (२७, दोघेही रा. त्रिवेणीनगर, एन-७) आणि दामोदर बालाजी आघाव (१९) आणि राधेश्याम दिगंबर गीते (२२ दोघेही रा. जयभवानीनगर) यांना अटक केली होती. चौघांना २९ जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींनी ज्या ठिकाणी हैदोस घातला होता, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांना लाठीचा प्रसाद देत आणि हातकड्या घालून त्यांची धिंड काढली. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड, उपनिरीक्षक अनिल नाणेकर, निवृत्ती गायके, सोपान नरळे, हवालदार दीपक देशमुख, विशाल सोनवणे, संदीप जाधव, अमोल अंभोरे, देवा साबळे, प्रकाश फरकाडे यांच्या पथकाने आरोपींना गुडघ्यावर आणत मस्ती उतरविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT