Chatrapati Sambhajinagar : पाडापाडीतील बाधितांना मिळणार मोबदला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar : पाडापाडीतील बाधितांना मिळणार मोबदला

महापौर राजुरकर : चिकलठाणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: चिकलठाणा, जालना रोड येथील रस्तारुंदीकरणाआड येणास्या मालमत्ता महापालिकेने जमीनदोस्त या केल्या. आता बाधित मालमत्तांधारकांच्या मोबदल्याच्या हालचालींकडे महापालिकेले लक्ष केंद्रित केले असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंगळवारी (दि. २४) महापौर समीर राजुरकर यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी शहर सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, आयुक्त जी. श्रीकांत, नगरसेवक रवी कावडे, मनोज गांगवे, प्रियंका दीपक खोतकर यांच्यासह कृती समितीचे शिष्टमंडळही उपस्थित होते. जालना रोडवरील चिकलठाण्यातील बाधित मालमत्तांबाबत झालेल्या या बैठकीत बाधितांनी महापौरांना कारवाईची माहिती देण्यात आली.

पाडापाडीची मोहीम राबविल्यानंतर बाधित मालमत्तांच्या क्षेत्राचा आर्थिक मोबदला महापालिकेने देणे आवश्यक होते, परंतु तसे न करता महापालिकेने अद्यापही मोबदला दिलेला नाही. मालकी हक्काच्या जागांच्या मोबदल्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिकेने नियमानुसार कारवाई केली नाही, असा आरोपही शिष्टमंडळाकडून करण्यात आला.

तसेच अद्याप बाधित क्षेत्रांची मोजणी आणि त्याबाबतच्या नोंदी महापालिकेने का घेतल्या नाहीत, असा सवालही उपस्थित केला गेला. परंतु बाधित मालमत्ताधारकांनी नगरभूमापनकडून बाधित क्षेत्रांची मोजणी करून मोबदल्यासाठी सविस्तर प्रस्ताव दाखल करावा, असे महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी बैठकीत सांगितले. त्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू करण्यात येईल, असे महापौर राजुरकर यांनी सांगितले.

महापौरांचे प्रशासनाला निर्देश

महापालिकेतील बैठकीत मालमत्ताधारक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून लवकर मोबदल्याबाबतचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश महापौर समीर राजुरकर यांनी प्रशासनाला दिले. तसेच सकारात्मक आणि व्यावहारिक तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT