DJ Sound During Vote Counting pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

DJ Sound During Vote Counting : डीजेचा आवाज घुमताच आयुक्त संतापले...

मतमोजणीच्या संवेदनशील वातावरणात अचानक मोठा आवाज घुमल्याने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेतली.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसी परिसरात मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. या मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर एका डीजे व्यावसायिकाने डीजेची 'टेस्टिंग सुरू केली. अन् डीजेच्या आवाज विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या कानावर पडताच त्यांनी पोलिस पथकाला पाठवून डीजे चालकासह वाहनाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यावरून संबंधिताला ताब्यात घेण्यात आले होते.

पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राजवळ डीजे वाजवण्यास कडक बंदी असताना, काही अंतरावर चाचणीच्या नावाने एका डीजे व्यावसायिकाने मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यास सुरुवात केली. मतमोजणीच्या संवेदनशील वातावरणात अचानक मोठा आवाज घुमल्याने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेतली.

विभागीय आयुक्तांनी तत्काळ डीजे बंद करत वाहन जप्त करण्याचे कडक आदेश दिले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित डीजे वाहनाला ताब्यात घेतले असून ते एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जमा केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT