जि. प. च्या नावाने बनावट भरती आदेशांचा सुळसुळाट file photo
छत्रपती संभाजीनगर

Zilla Parishad recruitment fraud : जि. प. च्या नावाने बनावट भरती आदेशांचा सुळसुळाट

नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर प्रशासनाच्या नावाखाली काही समाजकंटकांकडून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांच्या नावाने लॅब टेक्निशियन तसेच इतर पदांचे बनावट नियुक्ती आदेश तयार करून उमेदवारांकडून पैशाची मागणी केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

या संदर्भात जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांच्या स्वाक्षरीने कोणतेही नियुक्ती आदेश सध्या निर्गमित करण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषदेमार्फत कोणत्याही पदभरतीसाठी किंवा नियुक्तीसाठी पैशाची मागणी केली जात नाही. अशा प्रकारे कोणी आर्थिक व्यवहाराची मागणी करत असल्यास ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

...तर संपर्क करण्याचे आवाहन

भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती केवळ जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते. कोणाला बनावट फोन कॉल किंवा नियुक्तीपत्र मिळाल्यास त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT