छत्रपती संभाजीनगर येथे घटनास्‍थळावर येऊन पोलिसांनी तपास सुरु केला होता. Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : कामगाराची छातीत चाकू खुपसून हत्या

Chhatrapati Sambhajinagar Crime News | अल्पवयीन नशेखोराचे कृत्य ; हर्षनगर भागातील घटना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : कार्यक्रमासाठी नातेवाईकडे गेलेल्या कंपनी कामगाराचा १७ वर्षीय अल्पवयीन नशेखोराने छातीत चाकू खुपसून हत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१) रात्री साडेआठच्या सुमारास फाजलपुरा, लेबर कॉलनी भागातील गल्लीत घडली. रणजित सुधाकर दांडगे (३८, रा. टीव्ही सेंटर) असे मयताचे नाव असल्याची माहिती सिटी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

मयत रणजित हे नारेगाव भागातील एका कंपनीत कामाला होते. ते दोन वर्षांपूर्वी फाजलपुरा भागात राहत होते. हल्ली ते टीव्ही सेंटर भागात राहत होते. बुधवारी नातेवाईकाच्या घरी वाढदिवस असल्याने ते फाजलपुरा येथे आले होते. तिथे गल्लीत त्यांच्याशी त्याच भागातील १७ वर्षीय नशेखोराने वाद घातला. त्यात नशेखोर अल्पवयीनने चाकू काढून थेट रणजित यांच्या छातीत खुपसला. रणजित हे रक्तबंबाळ होऊन कोसळले. त्यांना तात्काळ बेशुद्धावस्थेत घाटीत हलविण्यात आले. मात्र, त्यांना तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. मात्र, तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT