वैजापूरः शेतजमीनीवरील मयत आजोबाच्या नावाच्या ठिकाणी तक्रारदार, त्यांची आई व चुलते यांचे नाव वारसा हक्कात नोंद करण्यासाठी अडीच हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी वैजापूर तालुक्यातील भायगावच्या महिला तलाठीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. अमिता सुरेशराव लंगडे (३७) राहणार फुलेवाडी रोड, वैजापूर असे लाचेच्या जाळ्यात सापडलेल्या महिला लोकसेवकाचे नाव आहे. फुलेवाडी रोडवर वसंत काळे यांच्या घरात भाड्याने राहत असलेल्या घरात ही कारवाई करण्यात आली.
या घटनेची अधिक माहिती अशी कि, तक्रारदार.यांची वैजापूर तालुक्यातील भायगाव शिवारातील गट क्रमांक १६ मध्ये शेतजमीन असून ती तक्राळदार यांच्या मयत आजोबा यांच्या नावावर आहे. तक्रारदार यांचे वडील मयत आहेत. महिला तलाठीने तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. पण तक्रारदार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती.संभाजीनगर येथे संपर्क तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषगांने ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय वगरे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.