छत्रपती संभाजीनगर

धानोरामध्ये विहीर खचून बापासह दोन मुलांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar well accident | विहिरीत खाली उतरुन पाणी काढत असताना ही दुर्दैवी घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड : विहीर खचल्याने बापासह दोन मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी (दि..९) रात्री घडली. विहिरीचे बांधकाम सुरु असल्याने विद्युत मोटारीने पाणी काढण्यासाठी बाप व दोन मुले गेले होते. या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे, शाम बाजीराव काकडे अशी मृतांची नावे असून या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली.

मृत बाजीराव काकडे यांच्या विहिरींचे काम बांधकाम चालू होते. विहिरींचे सिमेंट कडे ढासळू नये म्हणून मृत बाप व मुले रात्री विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेले होते. विहिरीत खाली उतरुन पाणी काढत असताना विहीर ढासळली. यात तिघांचा दबून मृत्यू झाला.

मृत बाजीराव काकडे यांची पत्नी एका लग्नातून शेतातील घरी परत आली. तेव्हा सदर प्रकार समोर आला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली व दोन मोठे एलआर (पोकलेन) यंत्र बोलावले. एलआर यंत्राच्या साह्याने माती काढून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आहे. सकाळी सात वाजेपर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरु होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT