Kavad Yatra : कावड यात्रेने छत्रपती संभाजीनगर दुमदुमले file photo
छत्रपती संभाजीनगर

Kavad Yatra : कावड यात्रेने छत्रपती संभाजीनगर दुमदुमले

हर हर महादेव, बम-बम भोलेचा जयघोष, तरुणांचा सर्वाधिक सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar was filled with excitement with the Kavad Yatra

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : श्रावणी सोमवारनिमित्त शहरात शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या कावड यात्रेमुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले. 'हर हर महादेव', 'बम बम भोले'च्या जयघोषाने यात्रा मार्ग दुमदुमून गेला. यात्रेत शहरातील तरुणांचा सर्वाधिक सहभाग दिसून आला.

यावेळी श्री क्षेत्र सरला बेट संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, शिवशंभो प्रतिष्ठानचे सागर भारस्कर, नगरसेवक राजगौरव वानखेडे, जीवकपाल हिवराळे, महेश माळवदकर, रामेश्वर भादवे, मुकेश जैन, सागर पाल आदी उपस्थित होते. गतवर्षाप्रमाणे यंदाही शिवशंभो प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार संजय केणेकर यांच्या वतीने या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

जाधववाडीतील श्री रामेश्वर महादेव मंदिर येथून श्री क्षेत्र सरला बेट संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी या कावड यात्रेला प्रारंभ झाला. हलगी, संबळ झांज पथकांसह उत्तर प्रदेशातील महाकाल पथक सहभागी झाले होते. वारकरी परंपरेतील भजने, गवळणी, अभंग, मृदंग आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने वातावरणात भक्तिरस निर्माण झाला.

उत्तर प्रदेशातील कलाकारांच्या सादरीकरणाने यात्रेचे विशेष शिवशंभ प्रतिष्ठान, आकर्षण वाढले. टीव्ही सेंटर चौक, गणेश कॉलनी, पंचायत समिती, चांदणी चौक, चेलीपुरा, शहागंज, महात्मा गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे यात्रा खडकेश्वर मंदिरात पोहोचली. येथे भाविकांनी भगवान महादेवाचा जलाभिषेक केला.

महाकाल पथकाने वाढविली रंगत

रंगतकावड यात्रेत उत्तर प्रदेशातील महाकाल पथकाने सादर केलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. हलगी, संबळ, झांज, मृदंग आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने निघालेल्या यात्रेत वारकरी परंपरेतील भजने, गवळणी आणि अभंगांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. महाकाल पथकातील कलाकारांच्या सादरीकरणामुळे यात्रेची रंगत आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT