अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. File Photo
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरः अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू

chhatrapati sambhaji nagar | शिऊर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद

पुढारी वृत्तसेवा

शिऊर :अज्ञात वाहनाने समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२४) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास शिवगाव पाटीजवळ घडली. काळू रामू जाधव (२८, रा.करोडी) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, काळू जाधव हा (एम एच २१ बी आर ५२९६) या क्रमांकाच्या दूचाकीवरून शिऊर बंगल्याकडून सोमवारी सायंकाळी तो त्याच्या गावाकडे (करोडी) जात असताना वैजापूर तालुक्यातील शिवगाव पाटी नजीक अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की,काळू रस्त्यावर फेकला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब,पोलीस नाईक गणेश गोरक्ष,संभाजी आंधळे यांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छ. संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवला आहे दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शिऊर पेालिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT