Toothbrush Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Medical Case Study: दात घासताना ठसका लागला अन् अख्खा टूथब्रशच पोटात गेला; संभाजीनगरची घटना

Chhatrapati Sambhajinagar News: उपचारानंतर रुग्णाला मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Health News

छत्रपती संभाजीनगर : दात घासताना अचानक ठसका लागल्याने हातातील अख्खा टूथब्रश थेट पोटात गिळला गेला. या विचित्र प्रकारामुळे प्रचंड घाबरलेला हा रुग्ण रात्री ११ वाजता मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रसंगी हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. चेतन राठी व त्यांच्या पथकाने मध्यरात्री तातडीने एंडोस्कोपी करत अवघ्या काही मिनिटांत पोटातून ब्रश बाहेर काढत रुग्णाला मोठा दिलासा दिला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या ३५ वर्षीय व्यक्तीला तंबाखू खाण्याचे व्यसन असल्याने दात व्यवस्थित स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दंततज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे सोमवारी (दि. २२) सकाळी दात घासताना त्याला अचानक तीव्र ठसका लागला आणि त्याच्या हातातील टूथब्रश थेट घशात सरकला. हा टूथब्रश अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा थेट पोटात अडकला होता. या घटनेमुळे अत्यंत भेदरलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत हा रुग्ण रात्री ११ वाजता आपल्या पत्नीसह मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला.

रुग्णाची बिकट अवस्था आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैहाकीय पथकाने तातडीने पोटविकारतज्ज्ञ डॉ. राठी यांना पाचारण केले. डॉ. राठी यांनी क्षणाचाही विलंब न लावता मध्यरात्रीच हॉस्पिटल गाठले. कोणतीही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया न करता, डॉ. राठी यांनी एंडोस्कोपीच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत पोटात अडकलेला टूथब्रश अत्यंत सहजतेने बाहेर काढला.

अश्रू ढाळत मानले डॉक्टरांचे आभार टूथब्रश थेट पोटात गेल्याने सकाळपासून हा रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांमध्ये फिरत होता. मेडीकव्हरमध्ये रात्री ११ वाजता आल्यानंतर डॉ. राठी यांनी काही मिनिटांत त्याच्या पोटातून टूथबाश काढून समोर ठेवला. त्यामुळे भावुक झालेल्या रुग्णाने रखतच डॉक्टरांच्या पायावर डोके ठेवले. त्याच्या पत्नीनेही अश्रू ढाळत डॉक्टरांचे आभार मानले. या यशस्वी उपचारांनंतर रुग्ण आणि त्यांचे कुटुंब घरी रवाना झाले.

अन्यथा जटील शस्त्रक्रिया- घेऊन रात्रीच एंडोस्कोपीव्दारे या रुग्णाच्या पोटातून टूथब्रश काढला. दात घासताना ठसका लागून हा ब्रश गिळला जाऊन अर्धा अन्न नलिकेत आणि अर्धा पोटात अडकला होता. उशिर केला असता तर टूथब्रश काढण्यासाठी त्या रुग्णाचे पोट फाडून शख्यक्रिया करावी लागली असती.
डॉ. चेतन राठी, पोटविकारतज्ज्ञ, मेडीकव्हर हॉस्पिटल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT