Chhatrapati Sambhajinagar fire audit pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar fire audit : महापालिका स्थापनेपासून मालमत्तांचे फायर ऑडिटच नाही

अग्निशमन विभागाची कबुली, रेस्टॉरंट, हॉटेल्सची होणार तपासणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या स्थापनेपासून शहरातील व्यावसायिक मालमत्तांचे फायर ऑडिटच झालेले नाही. कोणी तक्रार केल्यानंतरच व्यावसायिक मालमत्तांचे सर्वेक्षण होते, परंतु दिल्लीतील एका हॉटेलमध्ये घडलेल्या अग्निकांडानंतर आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेला जाग आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालयांसह सर्व व्यावसायिक मालमत्तांचे फायर ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.५) अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली.

शहरात अपार्टमेंट आणि प्रत्येक व्यरवसायिक मालमत्ता यांना अग्निशमन यंत्र बसविणे बंधनकारक आहे. बांधकाम परवानगी देतानाच ही सक्ती करणे आवश्यक आहे. परंतु महापालिका २४ मीटर उंचीच्याच बांधकामांना परवानगी देताना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची सक्ती करते. त्याशिवाय मालमत्तांना बांधकाम परवानगीच दिली जात नाही. यामुळे मागील ३० ते ४० वर्षांमध्ये शहर हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आणि कोचिंग क्लासेससह इतर व्यावसायिक मालमत्तांना अग्निशमन यंत्रणाच बसिवण्यात आलेली नाही.

या व्यावसायिक मालमत्तांनी अग्निशमन यंत्रणा बसवलेली नसतानाही महापालिकेने एकदाही या मालमत्तांचे फायर ऑडिट केले नाही, हे विशेष. अग्निशमन विभाग नागरिकांकडून तक्रार आल्यानंतरच संबंधित मालमत्तांची तपासणी करते. त्यामुळे शहराच्या जुन्या भागांमधील व्यावयासिक मालमत्तांमध्ये आगीची घटना घडलीच तर मोठा धोका निर्माण होण्याची दाब शक्यता आहे. त्यात दिल्लीव हॉटेलमध्ये घडलेल्या अग्निकांडानंत आता महापालिका अलर्ट मोडव आली आहे. शहरातील सर्वच व्यावसायिक मालमत्तांचे पुढील आठवड्यापासून फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट रडारवर- शहरातील लहानमोठे सर्वच हॉटेल्स, लॉजिंग, रेस्टॉरंट आणि बारसह कोचिंग क्लासेसमधील फायर सेफ्टीची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक पुढील आठवड्यापासून कोणत्याही हॉटेल्स, रेस्टॉरंटची अचानक जाऊन तपासणी करतील. यात जाण्या-येण्यासाठी योग्य जागा आहे का, अग्निशमन यंत्रणा बसवलेली आहे का यासह सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.
अमोल येडगे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT