उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीतील कलावंतांनी एकाच मंचावर येत आपली भूमिका मांडली. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : उपवर्गीकरणाविरोधात कलावंतांचा एल्गार

गीतांतून सरकारच्या धोरणावर टीका

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत महाराष्ट्रातील गायक, कवी, जलसाकार, प्रबोधनकार व आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीतील कलावंतांनी एकाच मंचावर येत आपली भूमिका मांडली. निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी (दि.१२) आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे शिलेदार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आंबेडकरी चळवळीतील विविध घटकांमध्ये असलेला विरोध सांस्कृतिक माध्यमातून व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कलावंतांनी आपल्या गीतांमधून सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करत उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शविला.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुनील खरे, सीमा न पाटील, विद्या बनसोडे, उर्मिला भिसे, संघपाल गवई, विशाल चव्हाण, न सपना खरात, शिवकुमार माने, विशाल मोरे, भाग्यश्री इंगळे, दत्ता पाईकराव आदींसह स्थानिक ड कलावंतांनी गीत व प्रबोधनाच्या २ माध्यमातून भूमिका मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल . इंगळे यांनी केले. महाराष्ट्रातील व विविध भागांतील प्रबोधनकार व कलावंतांना एकाच मंचावर आणण्यामागची भूमिका विजय वाहुळ यांनी स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आंबेडकरी चळवळीसमोरील राजकीय व सामाजिक आव्हानांवर भाष्य केले.

आंबेडकरी कार्यक्रमास चळवळीतील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, साहित्यिक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विजय वाहुळ, विशाल इंगळे व इतर कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमात 'ज्यांन सुखाचं खोललं दार असा माझा भीमराव पालनहार, तुझ्या रक्तामधला मला भीमराव पाहू दे जा जगाला सांग का, जा बाप माझा भीमराव आंबेडकर, आदी गीतं सादर करण्यात आली.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT