स्वयंचलित वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्रांमुळे आता बोगस फिटनेसवर लगाम लागणार आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : वाहनांच्या बोगस फिटनेसला आता लगाम

स्वयंचलित वाहन निरीक्षण केंद्रात संगणकीय तपासणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : यापूर्वी अधिका-यांच्या नजरेतुन वाहनांच्या फिटनेसची तपासणी व्हायची. दलाल हीच संधी साधून अनेक अनफिट वाहनांचेही फिटनेस प्रमाणा मिळवायाचे, आला याला लगाम लागला असून, आरटीओ कार्यालयातील करोडी येथे उभारलेल्या स्वयंचलित वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्रांत दररोज सुमारे १०० वाहनांची अत्याधुनिक पद्धतीने तपासणी करण्याचे काम वेगात सुरू आहे.

कमर्शियल वाहनांचे ब्रेक, हेडलाईट, सस्पेन्शनसह सर्व संगणकीकृत चाचच्या करण्यात येत असल्याने आता बोगस फिटनेस प्रमाणपत्रावर लगाम लागला आहे. वाहन तपासणीतील पारदर्शकता वाढविणे, मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि वाहनांच्या तांत्रिक क्षमतेवे अचूक मूल्यमापन करणे या उद्देशाने राज्यभर स्वयंचलित वाहन निरीक्षण केंद्रांची उभारणी केली आहे. त्यापैकी एक संभाजीनगरातील करोडी येथे हे केंद्र उभारण्यात आले आहे.

आजमितीला हलकी व जड व्यावसाविक वाहने, फिटनेससाठी येत आहेत. येथे सर्व वाचण्या संगणकीय प्रणालीद्वारे केल्या जात असल्याने आरटीओ अधिकारी आणि दलालावा हस्तक्षेप पूर्णपणे हरपार झाला आहे. संगणकीय प्रणालीमुळे वाहनांच्या फिटनेस अहवालात अधिक अचूकता येत असून, वाहनधारकांनाही कमी वेळेत सेवा मिळत आहे.

स्वयंचलित मोजमाप प्रणाली

आरटीओच्या माहितीनुसार, कहन निरीक्षणासाठी अत्याधुनिक सेन्सर, कॅमेरे आणि स्वयंचलित मोजमाप प्रणालीचा वापर केला जात आहे. वाहनाची प्रत्येक चाचणी संगणक प्रणालीमध्ये नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे मानवी चुका किंवा हस्तक्षेपाच संपला आहे. या सुविधेमुळे वाहनधारकांना पारदर्शक व जलद सेवा मिळत आहे. तसेच वाहनांची तांत्रिक स्थिती योग्य असल्याची खात्री झाल्याने रस्ते सुरक्षेलाही मोठी मदत होत आहे. याप्रमणाली मुळे आरटीओ कार्यालयातील अधिका-यांच्या कामाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

खासगी वाहनांच्याही तपासणीची शक्यता

आजमितीला केवळ व्यावसायिक वाहनांच्या फिटनेसची संगणकीय तपासणी करण्यात येत आहे. वेणाऱ्या काही दिवसांत खासगी वाहनांचीही तपासणी या केंद्रातून करण्याचा नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दल्यान सध्या केवळ व्यावसायिक वाहनांच्या तपासणीचे काम सुरू आहे.

या केंद्रात होतात या चाचण्या

  • ब्रेक कार्यक्षमतेची तपासणी

  • हेडलाईटवी तीव्रता व फोकस

  • व्हील अलाइनमेंट व सस्पेन्शन बाचणी

  • अंडरबॉडी तपासणी

  • अत्सर्जनाशी संबंधित प्राथमिक तपासणी

  • स्पीडोमीटर व इतर सुरक्षा बाबींची चाचणी

  • वाहनाच्या एकूण फिटनेसचा

  • संगणकीकृत अहवाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT