MCOCA Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : कुख्यात गुन्हेगार शुभम जाट टोळीवर मोक्का

गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर करत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिकनगर भागात दहशत माजवून गोळीबार करणाऱ्या अट्टल गुन्हेगार शुभम जाट आणि त्याच्या टोळीतील सात सदस्यांवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून दणका दिला आहे.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी सचिन बाली लाहोट हे घरात असताना टोळीप्रमुख शुभम जाट आणि त्याचे साथीदार धारदार शस्त्रे व पिस्तूल घेऊन घरासमोर आले. आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबाला मारण्याच्या उद्देशाने घरावर गोळीबार केला. तसेच गल्लीतील नागरिकांनाही धमकावले. परिसरात दहशत निर्माण केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या गुन्हेगार टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईची पूर्वपरवानगी १४ फेब्रुवारी रोजी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर करत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले (गुन्हे), एसीपी अशोक राजपुत व मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, रेशीम कोळेकर आणि त्यांच्या पथकाने केली.

यांच्यावर लावला मोक्का

टोळीप्रमुख शुभम भिकुलाल जाट (३१, रा. बीड बायपास) याच्यासह त्याचे सदस्य मयूर संजय उनगे (२१), विजय दिनकर धनई (२४), मनोज संजय पडुळ (२५), सागर प्रशांत राऊत (२०), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली मनोहर यादव (३२, पाचही रा. जयभवानीनगर), शिवा रमेश भालेराव (२०, रा. विश्रांतीनगर) आणि अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. जालना) यांच्यावर मोक्का लावला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी बुधवारी (दि.१८) दिली. यातील माउली सध्या फरार असून, अन्य आरोपी अटकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT