छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : तेलवाडी अत्याचारप्रकरणी पैठण तहसीलवर आक्रोश मोर्चा

अविनाश सुतार

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील तेलवाडी येथे दलित समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज (दि.४) दलित समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. Chh. Sambhajinagar

पैठण तालुक्यातील तेलवाडी येथे शनिवारी (दि. २) एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पैठण पोलिसांनी या आरोपींना तत्काळ अटक केली होती. Chh. Sambhajinagar

दरम्यान, पैठण तालुका दलित समाजच्या वतीने आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, पीडित मुलीला अर्थसहाय्य मिळावे, ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करावी, मुलीच्या नातेवाईकांना पोलीस संरक्षण द्यावे. गावात अशांतता निर्माण करणाऱ्या विरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार सारंग चव्हाण यांना देण्यात आले.

या मोर्चामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यावेळी. अमोल नरोडे, अॅड. प्रमोद सरोदे, महेंद्र साळवे, रावसाहेब अडसूळ, सुनील अडसूळ, नंदकुमार मगरे, भीमराव साळवे, जगन साळवे, गौतम बनकर, शोभा निकाळजे, कल्याण मगरे, अशोक पगारे, नवगिरे, आदिनाथ घाटेसावे आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT