Paithan Tehsil Office Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paithan News | एक महिन्यानंतर पुन्हा महिला शेतकऱ्याचे आंदोलन; पैठण तहसील कार्यालयाच्या भिंतीवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Paithan Tehsil Office

पैठण : शेतीच्या सातबारावर चुकीच्या व्यक्तीच्या नावाने झालेला फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महिला शेतकऱ्याने शुक्रवारी (दि. ३) पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या भिंतीवर चढून विद्युत खांबाला साडी बांधत गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याने तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली.

पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील शेतकरी शोभा बबन कुदळे यांच्या शेतीच्या सातबारावर चुकीच्या व्यक्तीचा फेर झाल्याचा आरोप असून, तो रद्द करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मागणीवर कार्यवाही न झाल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला

यापूर्वी सुमारे महिनाभरापूर्वीही शोभा कुदळे यांनी तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले' चित्रपटातील शैलीत आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी समजूत काढून त्यांना सुरक्षित खाली उतरविले होते.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी असताना शोभा कुदळे यांनी तहसीलदार कार्यालयासमोरील भिंतीवर चढून विद्युत खांबाला साडी बांधत गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच तहसील कार्यालयात एकच धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग तसेच पोलीस कर्मचारी तांबे, गायकवाड, पाटेकर आणि लक्ष्मण पुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आणि महसूल अधिकाऱ्यांनी संयमाने समजूत घालत काही तासांच्या प्रयत्नानंतर महिलेला गळफासाचा प्रयत्न थांबवून सुरक्षितपणे खाली उतरविले.

यानंतर नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांनी संबंधित प्रकरणात पुढील आवश्यक कार्यवाही करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती निवळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT