Sachin Ghayal Sugar Private Limited Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sant Eknath Sugar Factory | एफआरपी रक्कम थकीत; संत एकनाथ- सचिन घायाळ शुगर कंपनीच्या मालमत्तेचा ८ कोटीत लिलाव

एफआरपीची थकीत १९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम न भरल्याप्रकरणी मालमत्ता जप्तीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Sachin Ghayal Sugar Private Limited

पैठण : एफआरपीची थकीत १९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम न भरल्याप्रकरणी संत एकनाथ- सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली. कंपनीच्या जप्त मालमत्तेचा तब्बल ८ कोटी ९ लाख रुपयांना जाहीर लिलाव करण्यात आला आहे. या घटनेमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना करार पद्धतीने चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाची थकीत एफआरपी रक्कम १९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपये देण्यात आली नव्हती. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कंपनीची साखर, टायर व विना टायर बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच मोलॅसिस जप्त करण्यात आले होते.

ही जप्त मालमत्ता पैठण तहसील कार्यालयात शुक्रवारी तहसीलदार ज्योती पवार आणि नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांच्या उपस्थितीत लिलावासाठी ठेवण्यात आली. या लिलाव प्रक्रियेत आठ लिलावधारकांनी सहभाग घेतला. यामध्ये यश कन्स्ट्रक्शन सप्लायर्स, अहिल्यानगर यांनी सर्वाधिक बोली लावत मालमत्ता खरेदी केली.

साखर ५३७.८२ लाख, टायर बैलगाड्या १८१.२४ लाख आणि विना टायर बैलगाड्या ९०.७२ लाख अशा स्वरूपात एकूण ८ कोटी ९ लाख रुपयांना हा लिलाव पूर्ण झाला. यावेळी विशेष लेखा परीक्षक दीपक मोरे, कंपनीचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व कामगार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT