Chief Minister Loan Waiver Decision
पैठण : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ४) सकाळी पैठण बसस्थानक चौकात शेतकरी स्वाभिमानी संघटना, छावा क्रांतिवीर सेना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून त्यामध्ये किचकट अटी व नियमांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या योजनेच्या निषेधार्थ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत निर्णयाची होळी केली.
यावेळी शासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत यांच्यासह ज्ञानदेव मुळे, ज्ञानेश्वर उगले, साईनाथ कर्डिले, रामेश्वर बावणे, विशाल काळे, किशोर सदावर्ते, पवन सिसोदे, शिवाजी साबळे, सुभाष नवथर, कल्याण पोकळे, अशोक ठोंबरे, एकनाथ मिसाळ, संभाजी डांगे, कैलास मोरे, शिवाजी साटोले, विष्णू बर्डे आणि कृष्णा काळे यांच्यासह अनेक शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.