मुख्य जलवाहिनीवरील गळत्या बंद करण्यासह विविध ठिकाणच्या कामांसाठी मनपाने घेतलेल्या शटडाऊनदरम्यान पाईपलाईन जोडणीचे काम करताना कर्मचारी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Water Supply : १४०० मिमी जलवाहिनीच्या दुरुस्तीने जुन्या शहरात निर्जळी

२४ तासांचा शटडाऊन : आजपासून पुरवठा होणार पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजेपासून २४ तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे जुन्या शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र आज शनिवारी (दि. १०) सकाळी ७ वाजेपासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

महापालिकेने मुख्य जलवाहिनीवरील गळत्या बंद करण्यासह विविध ठिकाणच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हा शटडाऊन घेतला. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. रेल्वेस्थानकाजवळ फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर पंचवटी हॉटेलसमोर आणि पंचवटी चौकातील जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. तर अमरप्रीत हॉटेलसमोरील मास्टर चेंबरमधील व्हॉल्व्ह बदलण्यात आला.

याच ठिकाणी दिल्लीगेट जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत क्रॉस कनेक्शन जोडण्यात आले. तसेच रेल्वेस्थानक उड्डाणपुलाखाली १४०० मिमी उशिरापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ७ वाजेपासून जुन्या शहराचा पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

मात्र, पुरवठा सुरू झाल्यानंतरही विविध भागांतील पाणी येण्याच्या वेळेत बदल होण्याची शक्यता असल्याने व्यवस्था करावी लागल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. दुरुस्ती पूर्ण करून जलवाहिनीवरील गळत्या आणि तांत्रिक अडचणी दूर करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असला, तरी शटडाऊनमुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला आहे.

टप्पे एक दिवसाने ढकलले पुढे १४०० मिमी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी घेतलेल्या शटडाऊनमुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नियोजित पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजेपासून पुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याने नागरिकांना पाण्यासाठी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT