छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या नुकत्याच प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. प्रभागनिहाय निवडणूक होत असताना मतदार विभाजनात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे उघड झाले असून, प्रभाग दोन, पाच आणि सहा मधील मिळून सुमारे ३५०० मतदारांच्या नावांचा प्रभाग क्रमांक तीन मध्ये समावेश करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पडताळणी करून ठाकरे गटाकडून अधिकृत नोंदणी कार्यालयात पुराव्यासह आक्षेप दाखल करण्यात आला आहे. संबंधित मतदारांची नावे तातडीने वगळावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महापालिकेची निवडणूक यंदा शबीस्तान कॉलनी, हीनानगर, प्रथमच प्रभागनिहाय होत आहे. त्यामुळे काहीसा गोंधळ होऊ शकतो, असे मानले जात होते. चूक होण्याची शक्यता प्रशासनाने स्वतः मान्य केली आहे. मात्र या याद्यांमध्ये प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे.
संबंधित झोनमधील कर्मचार्याचना मतदार यादी विभाजनाची जबाबदारी न देता, पाणीपुरवठा, स्वच्छता, कर वसुली विभागातील कर्मचाऱ्यांकडे हे काम सोपवले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चुकांची मालिका घडल्याची माहिती वरिष्ठांनी दिली. तसेच २९ प्रभागांपैकी काही मोजक्याच प्रभागांत आक्षेप नसले तरी बहुसंख्य प्रभागांत आलेल्या तक्रारी उद्देशपूर्वक हस्तक्षेप झाल्याचे दिसून येत आहे. प्रभाग सहा मधील हा भाग प्रभाग सहाच्या सीमेलगतच्या रशीदपुरा, एसटी कॉलनी, फाजीलपुरा, चेलीप उमराव कॉलनी, मजनुहील या भागातील मतदारांचा प्रभाग तीन मध्ये समावेश करण्यात आला. तर प्रभाग दोन व पाच मधील हा भाग एवढ्यावरच न थांबता प्रभाग दोन व पाच मधील वानखेडेनगर, मुजफ्फरनगर, प्रगती कॉलनी, आसेफिया कॉलनी, नॅशनल कॉलनी, रोजेबाग परिसर, अल अमीन सोसायटी रोजेबाग, मौलाना आझाद कॉलनी एन-१३, गीतानगर रोजेबाग, गेस्टहाऊस क्वॉटर्स रोजेबाग, बिसमिल्ला कॉलनी जयभीमनगर, आरेफ कॉलनी, घाटी परिसर, टाऊन हॉल या भागातील मतदारांची प्रभाग तीनमध्ये नावे टाकण्यात आली आहेत.
मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
मनपा प्रशासनाकडून काही पक्षांना फायदेशीर ठरणारे प्रभाग तयार करून देण्यात आले असल्याचा आरोप या मतदारांनी केला असून, एवढ्यावरच न थांबता हे प्रभाग कमी मतदारांचे करण्यात येऊन प्रभाग दोन, पाच आणि सहा मधील मतदारांना प्रभाग तीनमध्ये टाकून त्यांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या भागातील मतदारांनी केला आहे.