छत्रपती संभाजीनगर

chhatrapati sambhajinagar : सहा महिन्याच्या चिमुकलीच्या आईने संपवले जीवन : कन्नड तालुक्यातील भोकनगाव येथील घटना

टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अस्पष्ट, विवाहीता २५ वर्षाची

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : तालुक्यातील भोकनगाव येथे एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील स्वयंपाकघरात पंख्याला गळफासाने मुत्यु झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दी. ८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयुरी सचिन खरे (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे भोकनगाव व चिंचखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे. या विवाहीतेला सहा महिन्याची मुलगी आहे. तर तिचा पती बँकेत नोकरीला आहे.

याबाबत मिळालेली अधिकच्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचखेडा येथील बस चालक संतोष आढाव यांची मयुरी ही एकुलती एक मुलगी होती. तिचा विवाह दिड वर्षांपूर्वी भोकनगाव येथील सचिन खरे यांच्याशी झाला होता. सचिन हे बँकेत नोकरीला असून या दांपत्याला सहा महिन्यांची एक लहान मुलगी आहे.

सोमवारी सकाळी मयुरीचे सासू-सासरे एका दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची तर पती सचिन हे कन्नड येथील बँकेत गेल्याची माहिती आहे. ​दुपारच्या सुमारास बाळचा रडण्याचा आवाज येत होता. बऱ्याच वेळानंतरही बाळ शांत होत नसल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांना संशय आला. त्यांनी घराकडे धाव घेत दरवाजा वाजवून मयुरीला आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आत प्रवेश केला असता, मयुरी स्वयंपाकघरात छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने कन्नड ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गिते, बीट जमादार कैलास करवंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप कनकुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पुढील तपासणीसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयुरीला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT