करमाड एमआयडीसी परिसरातील ज्या चेंबरमध्ये लेबर कंत्राटदाराचा मृतदेह आढळून आला त्याची पाहणी करताना पोलिस. (छाया : सुदाम पठाडे) 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar missing contractor body| बेपत्ता कंत्राटदाराचा मृतदेह चेंबरमध्ये, मोबाईल बंदनंतर अपहरणाची दाखल केली होती तक्रार

Chhatrapati Sambhajinagar missing contractor body found- अपहरणाची तक्रार दाखल; करमाड एमआयडीसीत खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Missing contractor's body found inside chamber in Chhatrapati Sambhajinagar

करमाड : गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोलटगाव येथील ५१ वर्षीय लेबर कंत्राटदाराचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी (ता. ३) दुपारी करमाड एमआयडीसी परिसरातील एका चेंबरमध्ये आढळून आला. इंद्रजीत बाबूराव खुळे (रा. गोलटगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. नवीन कंपनीचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील रस्त्यालगत मृतदेह आढळल्याने औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, खुळे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आता त्यांचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, मृत्यूमागील कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दहा दिवसांपासून सुरू होता शोध

इंद्रजीत खुळे हे लेबर कंत्राटदार म्हणून काम करीत होते. २३ ऑक्टोबर रोजी ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने कुटुंबीयांसह नातेवाइकांची चिंता वाढली होती. गेल्या दहा दिवसांपासून नातेवाइकांकडून विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र, त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता.

त्यांचे पुतणे विशाल भास्कर खुळे यांनी करमाड पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्त्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार

मंगळवारी करमाड एमआयडीसी परिसरात जमीन संपादित झालेल्या एका शेतकऱ्याला शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला असताना नवीन बांधकाम सुरू असलेल्या कंपनीसमोरील रस्त्यालगत असलेल्या चेंबरमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. संशय आल्याने त्याने चेंबरमध्ये डोकावून पाहिले असता कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसून आला. हा प्रकार पाहून तो घाबरला. त्यानंतर त्याने तातडीने करमाड पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहता फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले.

पंचनामा पोलिसांनी घटनास्थळाचा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविला. तपासादरम्यान मृतदेहाची ओळख इंद्रजीत खुळे अशी पटली.

फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे

कारण स्पष्ट होण्याची शक्यता शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, या प्रकरणाकडे गोलटगावसह करमाड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संतोष टिमकीकर आणि शाम ढवळे करीत आहेत.

मृत्यूमागील गूढ कायम दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या

कंत्राटदाराचा मृतदेह निर्जन परिसरातील चेंबरमध्ये आढळल्याने त्यांच्या मृत्यूमागील कारणाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खुळे यांचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला? त्यांचा मृतदेह चेंबरमध्ये कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला ? या घटनेमागे घातपात आहे की अन्य काही कारण, याचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT