Girls Kidnapping Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा तरुण अटकेत

तपासाअंती आदेश मालोदे याला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे

पुढारी वृत्तसेवा

वेरुळ : खुलताबाद तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या प्रियकराने साथीदाराच्या मदतीने मोटारसायकलवरून पळवून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आदेश दगडू मालोदे याला अटक केली आहे. त्याचा साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी ३५ वर्षीय शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संबंधित शेतकरी पत्नी व तीन मुलांसह शेतातील घरात राहतो. त्यांची १५ वर्षीय मुलगी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती. तिचे गावातील आदेश दगडू मालोदे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती. त्यानंतर वडिलांनी मुलीचे शिक्षण बंद केले होते. तसेच आदेश यालाही मुलीच्या मागे न लागण्याची समज दिली होती. गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजता वडील गोठ्यात झोपले होते.

रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पत्नीने पतीला उठवून मुलगी घरात दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात तिचा शोध सुरू केला. वडिलांनी शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांना मुलीचा शोध घेण्यास सांगितले. काही वेळाने एका शेतकऱ्याने फोन करून मुलगी आदेश मालोदे याच्यासोबत मोटारसायकलवर असल्याची माहिती दिली. तिच्यासोबत आणखी एक तरुण असल्याचेही समोर आले. यानंतर कुटुंबियांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली. शनिवारी (दि.२२) आदेश मालोदे व अल्पवयीन मुलगी नातेवाइकांसोबत पोलीस ठाण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासाअंती आदेश मालोदे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली असून, फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT