मृत साबेर शाकेर शेख. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : अल्पवयीन मुलाचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Electric shock death: घराच्या बांधकामावर पाणी मारीत असताना घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील आपल्या राहत्या घरी नविन बांधकामावर शनिवारी (दि.१९) रोजी सकाळी पाणी मारत असताना अचानक विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्यामुळे साबेर शाकेर शेख ( वय १६) रा.ढाकेफळ अल्पवयीन मुलाला विजेचा जोराचा धक्का लागुन तो जागेवरच ठार झाल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली आहे.

नातेवाईकांनी तात्काळ प्रथम गावातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.यास्मिन शहा यांनी तपासून पुढील उपचारासाठी बिडकीन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

नातेवाईकांनी या मुलाला एका खाजगी रूग्णालयात बिडकीनला दाखल केले परंतु त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याला तपासुन डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्याच्यावर दुपारी मुस्लिम धर्म पद्धतीने ढाकेफळ येथील कब्रस्तानात शोकाकुल वातावरणात दफन विधी करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT