बिबट्याच्या हल्‍ल्‍यात ठार झालेल्‍या शेळ्या  Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

leopard attack | नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

हतनूर (प्रतिनिधी) -कन्नड तालुक्यातील हतनूर येथील गावाशेजारी असलेल्या शेतातील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात तीन शेळ्या जागीच ठार झाल्‍या आहेत तर एक शेळी जखमी झाली. न शेळयांवर हल्ला करून बिबट्याने पलायन केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत राहिली असून या घटनेचा वनविभागाने पंचनामा केला आहे.

  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हतनूर येथील श्रीरंग भगवान मोहिते या शेतकऱ्याच्या गावाशेजारी असलेल्या हतनूर शिवारात शेतातील गट नंबर १३ मध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या.दि.१७ सोमवारी पहाटे ४ वाजता दू काढण्यासाठी गेले असता शेळ्यांचा फडशा पडलेला दिसून आला. तर बाजूच्या शेतात वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे उमटल्याने. हा हल्ला बिबट्यानेच केल्याची खात्री झाली आहे.

  यानंतर वनअधिकारी आव्हाड व पो.पा.प्रकाश पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करत सदर घटनेचा सविस्तरपणे पंचनामा केला. र पशुवैद्यकीय अधिकारी विजयकुमार मोखाडे यांनी ठार झालेल्या शेळयांचे शवविच्छेदन केले. या शिवारात मोठ्या प्रमाणात लोक शेतात वास्तव्यास असून रात्री-पहाटे शेतकामांसाठी बाहेर पडावे लागते. तसेच या शिवारात बिबट्याने पशुधनावर हल्ले सुरू केल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी हतनूर शिवारातील शेतक-यांनी केली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT