Khultabad Liquor Seizure Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Liquor Seized | बनावट विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

खुलताबाद तालुक्यातील पळसगाव शिवारातील हॉटेल विवानसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Khultabad Liquor Seizure

सुलतानपूर : बनावट विदेशी दारू तयार करून तिची वाहतूक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडच्या नावाने तयार केलेल्या बनावट विदेशी मद्याच्या १ हजार ४४० बाटल्या, दोन मोबाईल फोन आणि वाहन असा एकूण ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, किरण ज्ञानेश्वर उगले आणि मंगेश घनश्याम जाधव हे बनावट विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सोमवारी (दि. १०) खुलताबाद तालुक्यातील पळसगाव शिवारात हॉटेल विवानसमोर रस्त्याच्या कडेला सापळा रचला.

यावेळी काळ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कारमधून संशयित येताना दिसून आले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध ब्रँडच्या नावाने असलेल्या बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. त्यात एकूण १ हजार ४४० बाटल्या असून, त्यांची अंदाजे किंमत ३ लाख ४५ हजार ६०० रुपये आहे. याशिवाय दोन मोबाईल फोन आणि वाहन असा एकूण ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी किरण उगले आणि मंगेश जाधव या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमांनुसार छत्रपती संभाजीनगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई निरीक्षक ए. एन. साळोखे, दुय्यम निरीक्षक एस. बी. माने, पी. डी. मुंडे, ए. टी. निमगिरे तसेच जवानांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. बी. माने करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT