old age woman dies in road accident  
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar road accident|बँकेतून परतताना भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

बँकेतून निराधार योजनेचे पैसे काढून घरी परतताना काळाचा घाला

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर:संजय गांधी निराधार योजनेचे पैसे काढून घरी परतणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धेला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात जिजाबाई मुरलीधर काफरे (रा. गलनिंब, ता. गंगापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता. १३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली.

जिजाबाई काफरे या मंगळवारी नवीन कायगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. बँकेतील काम आटोपून त्या घरी परतत असताना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर रस्ता ओलांडत होत्या.

याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या जिजाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे गलनिंब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिजाबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान गळनिंब येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, धडक दिलेल्या वाहनाची माहिती मिळू शकली नसून, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT