मृत डॉ. संजय मनोहर तेली  
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : शेतीच्या व्यवहारातून कन्नड येथून बेपत्ता झालेल्या डॉक्टरचा खून झाल्याचे निष्पण्ण!

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडे येथील घटना : आरोपीने मृतदेह गोणपाटात बांधून धरणात फेकल्याची दिली कबुली

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : शेतीच्या व्यवहारासाठी कन्नड येथून गोराडखेडे (ता. पाचोरा) येथे गेलेले डॉ. संजय मनोहर तेली (५३, सांगवी प्र. लो., ता. पाचोरा, ह. मु कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. शेतीच्या व्यवहारातील वादातून शेतकरी राहुल धर्मराज पाटील (४४) आणि त्याचा नोकर संजय वामन भिल (५५, दोघे गोराडखेडे खुर्द, ता. पाचोरा) यांनी डॉक्टरचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. तेली हे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शेतीच्या व्यवहारासाठी १ लाख ९० हजार रुपये रोख घेऊन गोराडखेडे येथील शेतात आले होते. दुपारी २:४५ वाजेनंतर त्यांचा मोबाईल बंद झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यांची चारचाकी गाडी महामार्गावर उभी आढळली होती, तर गाडीची चावी जवळच असलेल्या रसवंती दुकानावर ठेवलेली होती.

शेतमालकावर संशय बळावला आणि..

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल संदीप पाटील आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान शेतमालक राहुल पाटील आणि त्याचा नोकर संजय भिल यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चौथ्या दिवशी दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह गोणपाटात बांधून बहुळा धरणात फेकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने धरणात रात्री शोधमोहीम सुरू केली होती. मृतदेह सापडल्या नंतर दी. २३ नोव्हेबर रोजी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. संजय तेली यांचे कन्नड शहरात गेल्या ३० वर्षांपासून वास्तव्यास होते यामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार असल्याने त्यांच्या या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT