Chhatrapati Sambhajinagar dead body found AI Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar|झुडुपातून दुर्गंध, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; खिशात चिठ्ठी सापडल्याने तपासाला नवे वळण

Chhatrapati Sambhajinagar dead body found | चपलेवरून नातेवाईकाने केली ओळख

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शहरालगतच्या बीड बायपास परिसरातील गांधेली शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. टँकर चालकांना झुडपातून कुबट वास आल्याने त्यांनी पाहणी केली असता मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी तात्काळ एमआयडीसी सिडको पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात हलवला. प्राथमिक पाहणीत मृतदेहावर कोणत्याही जखमा किंवा मारहाणीच्या खुणा आढळल्या नसल्याची माहिती आहे. मात्र, मृतदेहाच्या खिशात एक चिठ्ठी सापडल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, बायपासच्या खडी रोड परिसरातील एका तरुणाने केवळ चपलेवरून मृतदेह आपला मामाच असल्याचा दावा. गोरख अर्जुन राऊत असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी याच परिसरात एका वकिलाची हत्या झाल्याने या घटनेमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा मृत्यू घातपाताचा आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा सखोल तपास एमआयडीसी सिडको पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT